#

Advertisement

Monday, May 13, 2024, May 13, 2024 WIB
Last Updated 2024-05-13T12:01:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

...तर पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन !

Advertisement

उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्य 
बीड लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी खासदार उदयनराजे भोसले बीडमध्ये तळ ठोकून आहेत. मुंडे कुटुंबीयांशी उदयनराजेंचे खूप जवळचे संबंध असून पंकजा यांच्या प्रचारासाठी उदयन राजे मैदानात उतरले आहेत.
पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही तर मी राजीनामा देईन असे  उदयनराजे म्हणाले.  उदयनराजे ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पंकजा मुंडे यांना जिकून आणण्याचा निर्धारच व्यक्त केला. पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही तर मी राजीनामा देईन आणि त्यांना साता-यातून निवडून आणेन, असं विधान उदयनराजे भोसले यांनी केले. बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारसभेत उदयनराजे बोलत होते. यावेळी बोलतना उदयनराजे भावूक झाले. नेहमीप्रमाणे त्यांनी कॉलर उडवत पंकजांना मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे जनतेसमोर नतमस्तक झाले. पंकजा ताईला निवडून नाही दिल तर माझ्याशी गाठ आहे असं देखील राजे म्हणाले.
बहीण पंकजासाठी भाऊ धनंजय मैदानात
बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध पवार गटाचे बजरंग सोनावणे अशी लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसाठी बड्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनावणेंसाठी शरद पवारांची सांगता सभा बीडमध्ये होणार आहे. सोनावणेंना पंकजा मुंडेंचं आव्हान आहे. तर दुसरीकडे बहीण पंकजा मुंडेंसाठी भाऊ धनंजय मुंडे मैदानात उतरला आहे. पंकजांना निवडून आणण्यासाठी धनंजय मुंडेंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.