#

Advertisement

Monday, May 13, 2024, May 13, 2024 WIB
Last Updated 2024-05-13T12:12:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद

Advertisement

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 11 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. मतदान सुरू असतानाच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या गोडाउनमधील सीसीटीव्ही बंद पडल्याचे समोर आले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ज्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. त्या गोदमाचे सीसीटिव्ही सकाळी 10.50 पासून बंद पडलेले आहे. त्यामुळं यात काही काळंबेरं तर नाही ना अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाहीये. मी त्या विभागातील जे अधिकारी आहेत त्यांनाही फोन केला. पण त्यांचा काहीच रिप्लाय आला नाही. संबंधितांशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे कोणीही टेक्निशियन नाहीये. आमचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांना गोदाम दाखवत नाहीत. पोलिस म्हणतात आम्हाला काही सूचना मिळालेल्या नाहीत. काय चाललंय काय हे? असा सवाल शरद पवार गटाचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे.