Advertisement
रविंद्र धंगेकर पोलिस ठाण्यातच आंदोलनाला बसले
पुण्यातील सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केला आहे. पोलीस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्यातच धंगेकरांनी ठिया मांडला. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरू झालं आहे. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, असं म्हणत धंगेकरांचं निषेध आंदोलन सुरू झालं आहे. त्यामुळे आता पुण्याच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
