Advertisement
आरोप करीत मनोज जरांगे पाटील यांचाही इशारा
बीड : मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बहीण-भावाला इशारा दिला आहे मला बीडमध्ये येऊ दिले नाही तर तुम्हालाही महाराष्ट्रात फिरायचेय हे लक्षात ठेवा असं जरांगे पाटील यांनी म्हटल आहे. 8 जून रोजी बीडच्या नारायणगड इथं होणारी सभा पुढे ढकलली आहे, त्या सभेच्या अनुषंगानेच मी चार जूनची उपोषणाची तारीख जाहीर केली होती. पण सभा पुढे ढकलल्याने मी त्याच्या आधीच उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितल. बीडच्या केज तालुक्यातील नांदुर घाट इथं झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत. या जखमी कार्यकर्त्यांची जरांगे पाटील यांनी बीड जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
बीडमध्ये जो प्रकार सुरू आहे तो आता निवडणुकीनंतर होणं मला अपेक्षितच होते. मराठा मताची यांना गरज आहे, पण मराठा समाज बांधवांची नाही, त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्यांनी हि बाब लक्षात घ्यायला पाहिजे. मलाही आता धमक्या येत आहेत, तुझ्याकडे बघून घेऊ तुला जीवे मारू असं म्हटले जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही असे देखील म्हटलं जात आहे, माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे
