Advertisement
कोणालाच ठाऊक नाही उपमुख्यमंत्री कुठे आहेत
मुंबई : बारामती मतदारसंघातील मतदान 13 मे रोजी पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात समर्थकांना प्रश्न पडला आहे. बारामतीमधील मतदानाआधी अगदी दररोज प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधणारे आणि प्रचारसभांना हजेरी लावणारा अजित पवार अचानक नॉट रिचेलब झाले आहेत. त्यामुळेच समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही अजित पवारांच्या ठावठिकाण्याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यातील कोणत्याही कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहिले नाहीत. आता अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. बुधवारी दिंडोरीतील सभेमध्ये अजित पवारांऐवजी छगन भुजबळ उपस्थित होते तर कल्याणमधील सभेला सुनील तटकरेंनी हजेरी लावली. मात्र अजित पवार या सभांनाही दिसेल नाहीत किंवा घाटकोपरमधील रोड शोमध्येही सहभागी झाले नाहीत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी वाराणसीमधून उमेवदारी अर्ज भरताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. इथेही अजित पवारांऐवजी प्रफुल्ल पटेलांनीच उपस्थिती लावली.
