Advertisement
बारामती : बारामतीतील मतदान 7 मे झाल्यानंतर युगेंद्र पवार दिसणार नाहीत. परदेशात जातील, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. या टीकेला युगेंद्र पवार यांनी उत्तर दिलं आहे. मी बारामतीचाच आहे. जरी बाहेर कुणाला जायचे असेल तर त्याच्यात काही गैर नाही. गेली चार वर्षे दर सोमवार ते गुरुवारी मी बारामतीत असतो. लोकांशी संपर्क वाढल्यामुळे लोकं मला भेटतात, असं म्हणत युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या टीकेला युगेंद्र पवार यांनी उत्तर दिलं आहे. मतदानाच्या सात दिवसांनंतरच अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार सक्रिय आल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात युगेंद्र पवार लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत.
युगेंद्र पवार यांनी अचानक पक्ष कार्यालयाला भेट का दिली? यावर युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं. जेव्हा मी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी फिरत होतो. तेव्हा लोक अनेक प्रश्न घेऊन आमच्याकडे येत होती. त्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ते सोडवण्यासाठी आणि इतर अडचणी सोडवण्यासाठी लोकांना भेटण्याकरीता मी पक्षाच्या कार्यालयात आलो आहे, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
