Advertisement
शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार
राजगुरुनगर L शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करुन स्वाक्षरी केल्याचा प्रकार घडला आहे. प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराने बोगस मतदान होत असल्याचा प्रकार उघड केला आहे.
राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील मतदान केंद्रात धक्कादायक प्रकार घड आहे. मतदान केंद्रात बोगस मतदानामुळे गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंच्या प्रतिनिधींनी केंद्र प्रमुखांना जाब विचारला. बोगस मतदान होत असल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासन, निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा शंका उपस्थित होते आहे.
