#

Advertisement

Thursday, May 16, 2024, May 16, 2024 WIB
Last Updated 2024-05-16T11:04:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मोदींचा आत्मविश्वास गेला आहे !

Advertisement

शरद पवार रोखठोक बोलले 
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग आलेला असतानाच सुरुवातीपासूनच निवडणुकीच्या या धामधुमीत स्वत:ला झोकून देणाऱ्या शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. 
 नाशिकमधील पत्रकार परिषदेदरम्यान पवार यांनी भाष्य केलं. नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढासळला असल्यामुळे ते भरकटले आहेत असं मुंबईतील रोड शोसंदर्भात पवार म्हणाले. नरेंद्र मोदी हे प्रचार भाषणात धार्मिक आरक्षण आणि इतर भूमिका घेताना दिसत आहेत त्यासंदर्भातील प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिलं. 'मोदी सीएम असताना गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे. शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदी मला गुजरातला घेऊन जायचे. मोदींना मी इस्रायलला घेवून गेलो होतो. आता मात्र राजकारण करण्यासाठी ते माझ्यावर टीका करत आहेत', असं पवार म्हणाले. पंतप्रधानांसोबतच भाजपच्याही एकंदर भूमिकेवर शरद पवार यांनी टीका करत कांदा उत्पादकांचं मोदींकडून मोठं नुकसान झाल्याचं रोखठोक वक्तव्य केलं. कांदा प्रश्नाचा भाजपला पटका बसणार, असा थेट इशारा देत त्यांनी यावेळी केंद्राच्या कांदा धोरणावर टीका केली