#

Advertisement

Wednesday, May 22, 2024, May 22, 2024 WIB
Last Updated 2024-05-22T11:44:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बीड मतदारसंघात बोगस मतदान ? वाद थेट निवडणूक आयोगात

Advertisement

बीड : लोकसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान झाल्याच्या आरोपांचं प्रकरण आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलंय. याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवला होता आणि त्याबद्दल सारं काही व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट देण्यात आला आहे, असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं मतदान कसं झालं, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करणारे काही खळबळजनक व्हिडीओ समोर येत आहे. परळीच्या अनेक गावात धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बूथ कॅप्चर केल्याचा आरोप केला. आधी शरद पवार गटाच्या बबनराव गितेंनी बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. नंतर एक पत्रकार आणि निवडणूक अधिकाऱ्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. याआधीही रोहित पवारांनी निवडणुकीत झालेल्या गैर प्रकाराचे व्हिडीओ ट्वीट करत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. माहितीनुसार, निवडणूक आयोगाने बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना नोटीस बजावली. पण कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला असल्याचा आरोपही विरोधकांकडून होतो आहे.