#

Advertisement

Friday, May 31, 2024, May 31, 2024 WIB
Last Updated 2024-05-31T12:09:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाबळेश्वर येथील अग्रवालच्या मालकीचा बार सील

Advertisement

पुणे कार अपघातातील आरोपीला आणखी एक दणका

सातारा : पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई पोलिसांनी केली. विशाल अग्रवालच्या साता-यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर, तिथला बार सील करण्यात आला आहे. 
विशाल अग्रवालचा आणखी एक प्रताप समोर आला. नियम धाब्यावर बसवून अग्रवालनं महाबळेश्वरमध्ये पंचतारांकीत हॉटेल उभारलं आहे. विशेष म्हणजे शासकीय जागेत हे हॉटेल उभारल आहे. त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून हे फाईव्हस्टार दर्जाचं हॉटेल उभारल्यानं महाबळेश्वर नगरपालिकेत अनेक तक्रारी दाखल आल्या होत्या.  मात्र, कारवाई होत नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी केला होता. त्याचबरोबर विशाल अग्रवालने स्वत:च्या नावावर दाखवलेलं हे हॉटेल दुस-याला त्यानं भाडेतत्त्वावर दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.