Advertisement
मुंबई : बीसीसीआयने टीम इंडिया मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. या अर्जांमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाने अर्ज केले असल्याचं समोर आलं आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मुख्य प्रशिक्षकपदासाठी 3,000 हून अधिक अर्जदार मिळाले आहेत. मुख्य प्रशिक्षकपदासाठी 27 मेपर्यंत अर्ज करता येत होते, त्यामुळे आता ही मुदत संपुष्टात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला तेंडुलकर, धोनी, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि इतर माजी क्रिकेटपटूंच्या नावाने अनेक अर्ज आले. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसारख्या राजकारण्यांचीही नावाचेही बोगस अर्ज मिळाले आहेत. बीसीसीआयला यापूर्वीही बोगस अर्ज मिळाल्याचं समोर आलं होतं. 2022 मध्येही जेव्हा बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते, त्यावेळी त्याला सेलिब्रिटींच्या नावाने अनेक अर्ज प्राप्त झाले होते. यंदाच्या वेळी बीसीसीआयने इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज पाठवण्यास Google Forms चा वापर केला होता.
