Advertisement
कोल्हापूर :काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन झाले. माजी आमदार तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी. एन. पाटील यांना ओळखतात, गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार करत ते करवीर विधानसभा मतदारसंघातून 2004 आणि 2019 असे 2 वेळा आमदार झाले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे, अशा शब्दात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी पाटील याना श्रद्धांजली वाहिली.
