#

Advertisement

Thursday, May 23, 2024, May 23, 2024 WIB
Last Updated 2024-05-23T11:23:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदार पी.एन. पाटील यांचं निधन

Advertisement

कोल्हापूर :काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झाल. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपासून पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. ज्यानंतर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु झाले. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि 23 मे 2024 रोजी पहाटे त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पाटील यांच्या डोक्यारा मार लागल्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळं त्यांची प्रकृती खालावत गेली.  दरम्यान, जिल्हा काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांचं पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, सडोली खालसा या त्यांच्या मूळ गावी गुरुवारी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी एन पाटील यांची राज्यात ओळख. मागील 40 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असणाऱ्या पाटील यांनी कोल्हापूरच्या राजकारणासह समाजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. 2004 आणि 2019 असं दोनदा आमदारपदही त्यांनी भूषवलं.