Advertisement
प्रणिती शिंदे यांनी केला ७४ लाख ५३ हजार १८१ रुपयांचा खर्च
सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक प्रचाराकरिता केलेल्या खर्चाचा तपशील सोमवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला.
लौकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जा. राम सातपुते यांनी प्रचारासाठी ८१ लाख ७८ हजार ५६ रुपयांचा खर्च केला आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रचारा करिता ७४ लाख ५३ हजार १८१ रुपयांचा खर्च केला असल्याची माहिती लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येते. यापुढे उमेदवारांचा निवडणूक प्रचारावर खर्च झाला तर उमेदवारास निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई होऊ शकते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या तारखेस उपस्थित राहून उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीकडून खर्च सादर करणे आवश्यक असते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची माहिती आतापर्यंत तीनवेळा घेण्यात आली आहे.