#

Advertisement

Tuesday, May 28, 2024, May 28, 2024 WIB
Last Updated 2024-05-28T08:33:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भुजबळ नेहमी भारतीय जनता पार्टीला डिवचतात !

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमुळे निलेश राणे संतापले 

मुंबई : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याची झलक पाहायला मिळाली. राज्यातील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 90 जगांसाठी आग्रही असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं. तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीची उपेक्षा करु नये, असं ही भुजबळ थेट भारतीय जनता पार्टीचं नाव घेत म्हणाले. मात्र आता भुजबळांच्या या विधानावरुन महायुतीमधील मित्रपक्षांमधून नाराजी व्यक्ते केली जात आहे. असं असतानाच निलेश राणेंनी भुजबळांनी आवरलं पाहिजे असा खोचक सल्ला दिला आहे.
विधानसभा निवडणुकीला 80 ते 90 जागा देण्याच्या शब्दाची भाजपाला आतापासूनच आठवण करुन द्यावी, अशी अपेक्षा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेच्या जागा वाटपामध्ये अजित पवार गटाच्या वाटल्याला चारच जागा आल्याचं शल्य बोलून दाखवत भुजबळांनी विधानसभेला अशी खटपट करायला लागू नये अशी अपेक्षा आपल्या भाषणात व्यक्त केली. आता भुजबळांच्या याच आक्रमक भूमिकेवर निलेश राणेंनी त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवली आहे.