#

Advertisement

Tuesday, May 28, 2024, May 28, 2024 WIB
Last Updated 2024-05-28T08:41:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदार सुनील टिंगरेचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन ?

Advertisement

पुणे : कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे या तिघांच्या अटकेनंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात वडगावशेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरे यांनी डॉ. अजय तावरेंसाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारस पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे टिंगरे तेच आमदार आहेत जे 19 मे रोजी कल्याणी नगरमध्ये अपघात झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर पोलीस स्टेशनमध्ये पोहचले होते.
आता याच पत्रासंदर्भात टिंगरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. टिंगरेंनी मुश्रीफ यांना लिहिलेल्या या पत्रामध्ये , "उपरोक्त विषयान्वये माझ्या परिचयाचे डॉ. अजय तावरे हे पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत. यापूर्वी ससून सर्वोपचार रुग्णालयात त्यांनी वैद्यकीय अधीक्षक पदावर कोविड 19 च्या काळात उत्तम कर्तव्य पार पाडलेले आहे. तरी डॉ. अजय तावरे यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देणेबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी ही विनंती," असा मजकूर आहे.