Advertisement
अंतिम आकडेवारी आली समोर
सोलापूर : सोलापूर मतदारसंघाची फायनल आणि निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयाकडून अधिकृत आकडेवारी समोर आले आहे. सोलापुरात 59.19 टक्के मतदान झाले आहे. सुरुवातीला दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा मतदान करण्यात आघाडीवर होता मात्र अधिकृत फायनल आकडेवारी आल्यानंतर मोहोळ तालुका आणि त्या खालोखाल अक्कलकोट तालुका मध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडील अंतिम आकडेवारी नुसार सरासरी 57 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली जात होती. मात्र, आणखी दोन टक्के मतदान वाढेल अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली होती त्यानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात 59.19 टक्के इतके मतदान झाले आहे.
- मोहोळ 63.15 , अक्कलकोट 59.17 , पंढरपूर 59.04 , दक्षिण सोलापूर 58.28 उत्तर सोलापूर 59.15
- शहर मध्य 56.51,
