Advertisement
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बैठक
- सुनील तटकरे यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता सहा महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत सुनील तटकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
सुनील तटकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरही यावेळी भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांमध्ये विरोधकांनी अल्पसंख्यांक समाजात भीतीचं वातावरण निर्माण केलं, असा दावा सुनील तटकरे यांनी केला. आपल्याला 2004 मध्ये मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं. तेव्हापासून कार्यकर्त्यांच्या मनात होतं की, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावं. मात्र तसं केलं नाही. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ऑफर होती. मात्र ते बाकी पक्षात गेले नाहीत. ते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत राहिले. शरद पवार यांनी म्हटलं की छगन भुजबळ यांना मंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता. अजित पवार त्यावेळी नवखे होते, असं देखील सांगितलं. मात्र मला त्यांना सांगायचं आहे की 1999 पासून अजित पवार मंत्री होते. ते 9 वर्ष मंत्री यासोबत ते खासदर होते. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा अजित पवार यांचा होता, असं सुनील तटकरे म्हणाले.
