#

Advertisement

Saturday, May 4, 2024, May 04, 2024 WIB
Last Updated 2024-05-04T11:15:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बहिणीने भावाच्या घरी जास्त थांबायचं नसतं !

Advertisement

महादेव जानकर यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल 
बारामती : लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात खासदारकीसाठी थेट लढत आहे. दोन्ही बाजूंनी जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया ताईंना मी सांगेन बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस नाही राहिलं पाहिजे. बहिणीने तीच्या घरी जावं, देशाच एनडीएचं सरकार बनत आहे, बारामतीचा खासदार हा सरकारला समर्थन करणारा बनावा म्हणून सांगायला आलोय असा टोला जानकरांनी लगावला आहे. 
जानकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान महायुतीत यशस्वी मध्यस्थी झाल्याने परभणीची जागा रासपसाठी सोडण्यात आली. जानकर आता परभणीतून लोकसभेसाठी नशीब आजमावत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर बारामती दौऱ्यावर आले आहेत. 
मी मंत्री होतो तेंव्हा 22 योजना धनगर समाजासाठी सुरू केल्या होत्या. काँग्रेस सरकारने अश्या योजना कधी लागू केल्या, अस सवाल त्यांनी विचारला. उद्या केंद्रात मी खासदार होणार आहे, आदिसांच्या 22 योजना धनगर समाजाला द्याव्या ही मी मागणी मोदींना करणार असे जानकर म्हणाले.