#

Advertisement

Saturday, May 4, 2024, May 04, 2024 WIB
Last Updated 2024-05-04T11:21:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

साहेब, मलाही मुलीसारखं सांभाळून घ्या…!

Advertisement

रोहिणी खडसे यांचं शरद पवार यांना साकडं 
रावेत :माझे वडील भाजपमध्ये गेले तरी मला पक्षात थांबायचं आहे. तुमचा आदेश आणि सूचना असेल तर आपल्याच पक्षात थांबण्याची माझी इच्छा आहे. कारण मला या पक्षाची विचारधारा आवडते. पक्षाचं नेतृत्व आवडतं आणि नेतृत्वात असलेली जिद्द आवडते. आमच्या वाईट काळात आपण आम्हाला साथ दिली. ते आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. म्हणूनच मला या पक्षात थांबायचं आहे. सुप्रिया सुळे जशी तुमची कन्या आहे. तसंच मलाही मुलगी समजून सांभाळून घ्या. सुप्रिया यांच्यासारखंच माझ्यावरही प्रेम करा, असं आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना केले आहे.  
रावेर लोकसभेच्या पक्षाच्या उमेदवाराला लीड देण्याचं काम मी करेल. तुतारी चिन्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणायचं आहे. आपले उमेदवार संसदेत पाठवायचे आहेत. पवार साहेबांनी राज्यातील वातावरण फिरवलं आहे. त्यामुळे विजय आपलाच होणार आहे, असं सांगतानाच जिल्हा बँकेत कर्जासाठी शेतकऱ्यांना वणवण फिरावं लागत आहे, त्यांनाही न्याय द्यायचा आहे, असं रोहिणी खडसे म्हणाल्या. 
दरम्यान, नाथाभाऊ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पवार साहेबांच्या समोर रोहिणी यांनी सांगितलं की, नाथाभाऊंना कुठे जायचं तिकडे जाऊ दे, पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. काही झालं तरी मी तुमच्यासाठी काम करणार आहे. वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असताना मुलीने वेगळा निर्णय घेणे हे सोप्पं काम नाही. पण रोहिणीताईंनी तो निर्धार केला. पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत.