#

Advertisement

Monday, May 27, 2024, May 27, 2024 WIB
Last Updated 2024-05-27T11:01:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदाराचा फोन अन् डॉक्टरांनी मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?

Advertisement

 पोर्शे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे

पुणे : 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत असताना पोर्शे कारने दोघांना चिरडले यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर अजय तावरे याला रक्ताचा नमुना बदलण्यास पुण्यातील एका आमदाराचा फोन आल्याचे समोर आले आहे.
डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांनी त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने कचऱ्याच्या पेटीत टाकले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हलनोर यांनी हे रक्ताचे नमुने बदलले. पहिल्या सॅम्पलमध्ये अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेत औंधमधील सरकारी रुग्णालयात दिले होते. औंध रुग्णालयात वडील आणि मुलगा दोघांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन मुलाचे सॅम्पल मॅच झाले. पण ससूनमधील रक्ताचा अहवाल मॅच झाला नाही. त्यानंतर पुणे पोलिसांनी डॉ. श्रीहरी आणि अजय तावरेला अटक केली आहे.