Advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये न्यायाधीशांनी केली पाच तास पाहणी
छत्रपती संभाजीनगर : पाणी प्रश्न पेटला आहे. पाणी प्रश्नाची हायकोर्ट गंभीर दखल घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठाचे दोन वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती आर एम जोशी थेट पाणी योजनेच्या काम पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यांनी संभाजीनगरच्या नक्षत्रवाडी पासून थेट जायकवाडी योजनेच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि कामाची गती वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
पाणी प्रश्नावर खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. पाणी योजनेच्या गतीवर तिथं नियमित सुनावणी होते. मात्र, कंत्राटदाराकडून प्रशासनाकडून कामाबाबत समाधान होत नसल्याने हायकोर्टच्या या न्यायाधीशांनी थेट मैदानावर उतरूनच पाहणी करण्याचे ठरवलं. कामात सुधारणा करण्याचा आणि गती वाढवण्याचे निर्देश दिले.
जायकवाडी धारणापासून पासून ते नक्षत्रवाडी पर्यंत मुख्य जलवाहिनी टाकणे. शहरात अंतर्गत जलवाहिनीचे जाळे निर्माण करणे. 50 हुन अधिक जलकुंभ बांधणे आणि 2 हजार किमी शहरात जलवाहिनी टाकणे आणि रोज पाणी देणे, अशी योजना असून ती रेंगाळली आहे.
