#

Advertisement

Thursday, May 9, 2024, May 09, 2024 WIB
Last Updated 2024-05-09T11:41:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिंदे हे ४ जूननंतर तडीपार होतील किंवा जेल मध्ये जातील !

Advertisement

अहमदनगर : खासदार संजय राऊत यांनी भाजपसह मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली.खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ४ जूनपर्यंत शिंदे यांना काय तांडव करायचा आहे ते करू देत. शिंदेंनी भ्रष्टाचारावर बोलावे, स्वतःच्या भ्रष्टाचारामुळे ते गळपटले होते. आता ४ जूननंतर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील, असा दावा राऊत यांनी केला आहे.
देशातील अनेक छोटे-मोठे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना कधीच विसर्जीत होणार नाही, किंवा विलनीकरण होणार नाही. आम्ही आमचा पक्ष आनेक संकटात टिकवून ठेवला, बाळासाहेब ठाकरे असतानाही अनेक नेते सोडून गेले. जुने जातात नवे येतात. आमच्याकडे आत्मविश्वास आहे, लोकांचा विश्वास आहे, आमच्याकडे पक्ष नेतृत्व आहे, असे राऊत म्हणाले.