#

Advertisement

Monday, May 27, 2024, May 27, 2024 WIB
Last Updated 2024-05-27T11:21:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दहावी बोर्डाचा निकाल जाहीर

Advertisement



यंदाच्या निकालाची खास वैशिष्ट्यं 
मुंबई : शिक्षण मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला. यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेमध्ये दमदार कामगिरी करत कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. कोकण विभागाच्या यंदाच्या निकालाची आकडेवारी आहे 99.01 टक्के. शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार या वर्षीसुद्धा निकालावर मुलींचच वर्चस्व पाहायला मिळालं. 
यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळानं एटीकेटीची तरतूद केली आहे. ज्यामुळं अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं एक वर्ष व्यर्थ जाणार नाहीय. दहावीच्या एखाद्या विद्यार्थ्याला एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होता आलं नाही तरीही ते विद्यार्थी इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असतील. 

कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येणार सर्व विषयांचे निकाल?
https://mahresult.nic.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/
http://sscresult.mkcl.org  

राज्यातील निकालाची विभागनिहाय आकडेवारी 

विभाग

 

निकालाची टक्केवारी

 

पुणे 96.44 टक्के
नागपुर 94.73 टक्के
छत्रपती संभाजीनगर 95.19 टक्के
मुंबई 95.83 टक्के
कोल्हापूर 97.45 टक्के
अमरावती 95.58 टक्के
नाशिक 95.28 टक्के
लातूर 95.27 टक्के
कोकण 99.01 टक्के