#

Advertisement

Monday, May 27, 2024, May 27, 2024 WIB
Last Updated 2024-05-27T11:37:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

छ. संभाजी नगरात महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले

Advertisement

5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक 
छत्रपती संभाजी नगर:  संभाजी नगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या 5 महिन्यांत  18 वर्षांवरील 286 महिला बेपत्ता झाल्या आहेत.कौटुंबिक कारणातून, पती-पत्नी विसंवाद, अनैतिक संबंधातून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे.
संभाजीनगरातून 2023 मध्ये490 महिलानी घर सोडले तर 156  महिलांनी गेल्या 5 महिन्यात घर सोडले. गेल्या 17 महिन्यात एकट्या संभाजी नागरातून 646 महिला घर सोडून बेपत्ता झाल्या आहेत. यातील तब्बल  540 महिला पोलिसांना सापडल्या तर काही घरीही परत आल्या. मात्र महिला घर सोडून का जात आहेत हे मात्र गंभीर आहे.
महिला घर सोडून जाण्याची प्रमुख कारणं : पती-पत्नी मधील भांडणं, इच्छेविरुद्ध विवाह, कौटुंबिक हिंसाचार, अनैतिक संबंध, भौतिक सुखाची महत्वाकांक्षा.
यासह काही ठिकाणी काही वेगळी कारणंसुद्धा सापडतात .. पोलिसांनी पती-पत्नीत भरोसा राहावा, त्यांनी सौख्य राहावे म्हणून 'भरोसा सेल'ची स्थापना केली आहे. मात्र तिथंसुद्धा गेल्या 5 महिन्यात पती पत्नीनी एक महिन्यात 546 तक्रारी दाखल केल्या आहेत..