#

Advertisement

Monday, May 6, 2024, May 06, 2024 WIB
Last Updated 2024-05-06T11:15:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धर्मवीर चित्रपटात दाखवलं "ते" खोटं !

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा

ठाणे : आनंद दिघेंनी मला उभं केलं. ते माझ्या पाठीशी उभे राहिले. पण राजन विचारेंबाबत धर्मवीर चित्रपटात दाखवलं ते खोटं होतं. राजन विचारे स्वत:हून आले आणि राजीनामा दिला असं काही नव्हतं. दुसऱ्या चित्रपटात आम्ही सगळं दाखवणार आहे.  आनंद दिघे यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला नाही. हे काय चालू आहे. माझं पद काढून घेत आहेत अशी विचारणा केली. तो दिघे साहेबांना नको ते बोलला. मी शेवटी साहेबांना असं करु नका सांगितलं. मग साहेबांनी त्याला बोलवलं आणि आपल्या भाषेत, आतल्या खोलीत समजावलं. आम्ही चित्रपटात उलट, चांगलं दाखवलं, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.  
ठाण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला  मुख्यमंत्री शिंदे संबोधित करत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याची वेळ आली तेव्हा दिघे साहेबांनी राज ठाकरे यांना पद द्या असं सुचवलं होतं. दिघे साहेबांना मानसिक त्रास झाला होता. दिघे साहेब गेल्यानंतर मी उद्दव ठाकरेंना भेटलो तेव्हा त्यांची संपत्ती कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली. तो फकीर माणूस, दोन हाताने सगळं वाटणार त्यांची काय संपत्ती असणार. मला त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत असं वाटलं, पण नाईलाजाने काम करावं लागलं, अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.