#

Advertisement

Tuesday, May 28, 2024, May 28, 2024 WIB
Last Updated 2024-05-28T12:19:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पाठपुराव्याला यश

Advertisement

आळंदीत उभारणार सहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह

सोलापूर :आळंदी येथील देहुफाटा येथे नगरपालिकीने नऊ गुंठे जागा दिली आहे. यामध्ये सहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहासाठी अनुदान देण्याबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनीही पत्र दिले आहे. या ठिकाणी सदर काम तत्काळ सुरू करण्याची मागणी माजी मंत्री तथा भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री पाटील यांनी सदर ठिकाणी सांस्कतिक सभागृहाच्या कामासंदर्भात जिल्हा नियोजन समितीला सूचना केल्या आहेत, यामुळे हे काम लवकरच मार्गी लागणार असल्याने माजी मंत्री ढोबळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आळंदी देहुफाटा येथेआण्णाभाऊ साठे स्मारक पुतळ्यासाठी नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून देण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, सह आयुक्त. नगरपालिका प्रशासनास सूचना केली आहे. या प्रकरणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी (दि. 05/03/2023) पालकमंत्री पाटील यांना पत्र दिले होते. याकामी सातत्याने पाठपुरावा केल्याने पालकमंत्री पाटील यांनी सदर विषयास अनुसरुन, मौजे आळंदी देहुफाटा येथे आण्णाभाऊ साठे स्मारक पुतळ्यासाठी नगरपरिषदेने जागा उपलब्ध करुन दिली असल्याबाबतचे पत्र सहायक जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयास दिले असून आहे. त्यामुळे आळंदी येथील देहुुफाटा येथे सहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पाठपुराव्यातून सदर प्रश्‍न मार्गी लागल्याने समाजाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.