#

Advertisement

Tuesday, May 14, 2024, May 14, 2024 WIB
Last Updated 2024-05-14T12:47:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिक्षक आणि पदवीधर निवडणूक पुढे ढकलली

Advertisement

मुंबई :  महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात 10 जूनला मतदान होणार होतं. पण ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात होती. 10 जूनला अनेक शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चारही जागांवरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ हा येत्या 7 जुलैला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली होती .