#

Advertisement

Thursday, June 13, 2024, June 13, 2024 WIB
Last Updated 2024-06-13T12:14:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मी 15 जूनपासून आभार दौरा करणार

Advertisement

पंकजा मुंडेंची समर्थकांसाठी पोस्ट 
बीड : माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. आई बापाला दुःख देऊ नका. त्यांच्या जीवाला घोर लावू नका. तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ आहे, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी पोस्टमधून केलं आहे. यावेळी त्यांनी मी 15 जूनपासून आभार दौरा करत आहे. तोपर्यंत सर्वजण प्रतिक्षा करा अशी घोषणाही मुंडे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी 7 हजार मतांनी पंकडा मुंडेंचा पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील ऊसतोड कामगाराने आत्महत्या केली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत समर्थकांना आवाहन केलं आहे. मी पराभव स्विकारला आणि पचवला असल्याचं मुंडे यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.
स्वतः च्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे. तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे किती कठीण आहे माझ्यासाठी हे कळतंय का? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे,  असेही मुंडे यांनी म्हटले आहे.