Advertisement
प्रहार जनशक्ती संघटनेची तयारी
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. महायुतीचे घटक असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. बच्चू कडू महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत 20 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे.
बच्चू कडू यांनी विधानसभेला एकला चलो चा... नारा दिला आहे. विधानसभेसाठी 20 जागा लढवणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू महायुतीतून निवडणूक लढवणार नाहीत अशी देखील चर्चा आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत निर्णय घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. त्यामध्ये चर्चा करून महाराष्ट्रात मजबूत उमेदवार उभा करुन 20 जागा लढविण्याचा निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले.
