#

Advertisement

Thursday, June 13, 2024, June 13, 2024 WIB
Last Updated 2024-06-13T12:25:59Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तुम्हाला काय माहिती माझ्या मनात काय दु:ख !

Advertisement

मुंबई : तुम्हाला काय माहिती माझ्या मनात काय दु:ख आहे. तुम्ही माझ्या मनात गेले आहेत का? असं कसं होतं? पक्षात असं मागितलं जातं. कुणाला मिळतं तर कुणाला नाही मिळत. पक्षात शिस्त पाळावी लागती, अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची एक जागा सध्या रिक्त आहे. या जागेसाठी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत होतं. सुनेत्रा यांच्यासह त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नावदेखील चर्चेत होतं. सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांची राज्यसभेत वर्णी लावावी, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांचीदेखील त्यासाठी सहमती होती. पण ऐनवेळी छगन भुजबळ यांनी आपण देखील राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची भावना पक्षाकडे बोलून दाखवली. त्यामुळे अजित पवार हे धर्मसंकटात सापडले. याबाबत पक्षांतर्गत बरीच चर्चा, खलबतं झाली आणि अखेर सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. पण यामुळे छगन भुजबळ हे दुखावले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.