#

Advertisement

Saturday, June 1, 2024, June 01, 2024 WIB
Last Updated 2024-06-01T14:19:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महायुतीचं 45+ चं स्वप्न अपूर्ण राहणार ?

Advertisement

एक्झिट पोल चित्र : मविआत ठाकरे गट मोठा भाऊ
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या 48 जागांचा समावेश असून मतदार महायुतीला कौल देणार की महाविकास आघाडीला हे पाहावं लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे औत्सुक्याचं आहे.

  • रिपब्लिक-मॅट्रीज एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात एनडीएला 30 ते 36 जागा मिळू शकतात. तसंच इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडीला 13 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना एकही जागा मिळणार नाही. 

  • टीव्ही 9 -पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी 23 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. तर इतरांना 1 जागा मिळेल. भाजपाला 18, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. तर मविआत काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14, पवार गटाला  6 जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. 
  • एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 24 जागा मिळतील. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 6, भाजपाला 17, अजित पवारांना 1 जागा असेल. तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना 9, शरद पवारांना 6 आणि काँग्रेसला 8 अशा 23 जागा मिळतील. 1 जागा इतरांना मिळेल.
  • न्यूज 18 - मेगा एक्झिट पोलनुसार महायुतीला 32 ते 35 आणि महाविकास आघाडीला 15 ते  18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये भाजपाला 23, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 2 जगा मिळतील. दरम्यान महाविकास आघाडीत काँग्रेसला 5, उद्धव ठाकरे गटाला 7 आणि शरद पवार गटाला 4 जागा मिळतील. 

(हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)