Advertisement
पुणे अपघात प्रकरण : आता सारवासारव
पुणे : पालकमंत्री अजित पवारांनी कार अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंची पाठराखण केली आहे. सुनील टिंगरेंवरील आरोप बिनबुडाचे असून, टिंगरे लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले होते. आमदार टिंगरेंनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला नाही, कुणालाही पाठीशी घाला, असं टिंगरे म्हणाले नाहीत, आमदाराच्या मतदारसंघात जेव्हा कुठली घटना घडले तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तो तेथे जात असतो. सुनील टिंगरे देखील त्यासाठीच तेथे गेले होते. असं म्हणत अजित पवार यांनी टिंगरेंची पाठराखण केली आहे.
अजित पवारांनी सांगितलं की, मी पोलीस आयुक्तांना पुण्यातील केससंदर्भात एकही फोन केला नाही.दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर तपासाची चक्र फिरली.या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबण करण्याते आले आहे. ससूनमधील दिरंगाई करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जात नाही. ही घटना जशी सर्वांनी गंभीर घेतली आहे तशीच सरकारने ती गांभीर्याने घेतली आहे, असं अजित पवारांनी सांगितल.
