Advertisement
कोल्हापुरात 8 जणांना चिरडले
कोल्हापु : सायबर चौकात भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तब्बल 8 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र. कुलगुरुंची असल्याचे समोर आले आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरु व्ही एम चव्हाण यांच्या कारने दुचाकींना धडक दिली. या अपघातात शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही एम चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. व्ही एम चव्हाण यांची तब्येत बरी नसतानाही ते कार चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कोल्हापूरमध्ये असलेल्या सायबर चौकात दुपारच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एका कारने अनेक गाड्यांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत. शिवाजी विद्यापीठ रोडवरुन येत असताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर कार चालकाने चौकात उभ्या असलेल्या चार मोटार सायकलला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाले आहे.
