Advertisement
यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये नेमकं काय झालं?
अमरावती : खासदार कार्यालयाचा वाद पेटला आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार कार्यालयाचं कुलूप तोडल आहे. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे आणि काही कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते. दरम्यान खासदार कार्यालयाचा ताबा दिला जात नसल्याने यशोमती ठाकूर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार वाद झाला. चावी दिली जात नसल्याने अखेर यशोमती ठाकूर यांनी कार्यालयात ताब्यात घेण्याचा इशारा देत कुलूप तोडल आहे.
भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव होऊनही त्यांनी कार्यालय न सोडल्याने यशोमती ठाकूर यांनी कुलूप तोडून नवनिर्वाचित खासदार बबळवंत वानखेडे यांच्यासह प्रवेश केला. याआधी यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. आम्हाला हे सरकार दुजाभावाची वागणूक देत आहे असंही त्या म्हणाल्या.
कार्यालयाचा ताबा देत नसल्याने यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. यावेळी तिथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यशोमती ठाकूर यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना हे बरोबर नाही, असं सांगत संताप व्यक्त केला. तसंच ही खासदारांशी वागण्याची पद्धत नाही सांगत अधिकाऱ्यांना जाब विचारला. गरीब व्यक्ती खासदार झाला म्हणून अशी वागणूक देता का? अशी विचारणाही त्यांनी केली.
आम्ही इतकी दादागिरी नाही केली, आम्ही तर तुम्हा अधिकाऱ्यांना मीटिंगमध्ये घेऊन बसत होतो] अशी आठवण यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना करुन दिली. तुम्हाला आमच्यावर हवे तर गुन्हे दाखल करा. आम्ही तुम्हाला सांगून ऑफिस ताब्यात घेत आहोत असं त्यांनी चंद्रकांत पाटलांना सांगितलं.
