#

Advertisement

Saturday, June 22, 2024, June 22, 2024 WIB
Last Updated 2024-06-22T11:39:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधानसभेच्या..., शरद पवारांचं मोठं विधान !

Advertisement

मुंबई : आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी रहावी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो असं शरद पवार म्हणाले आहेत. मोदीबागेत भेटण्यासाठी आलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवारांनी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे विधान करत एकाप्रकारे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला संकेतच दिले आहेत.
शरद पवारांनी यावेळी सांगितलं की, आपल्याला लोकसभेला     जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी रहावी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो. एकत्रित राहिलो म्हणून आपल्याला यश मिळालं. उद्यापासून विधानसभेच्या कामाला लागा. राज्य हातात घ्यायचं आहे याची तयारी ठेवा. लोकांची जास्तीत जास्त काम करा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. लोकांचा फारसा संबंध दिल्लीत येत नाही राज्यात प्रश्न असतात. त्यामुळे विधानसभेच्या कामाला लागा असं शरद पवार यावेळी म्हणाले.