Advertisement
विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे एक सूचक विधान
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाला स्थान देण्यात आले नाही. अजित पवार गटाने राज्यात एकूण 4 जागा लढवल्या. मात्र केवळ रायगडमधील जागेवर त्यांना विजय मिळवता आल्याने कॅबिनेट मंत्रिपद नाकारण्यात आलं. स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्य मंत्रिपद स्वीकारण्यास अजित पवार गटाने नकार दिला. यावरुनच आता राज्यामध्ये अजित पवार गट अस्वस्थ आणि नाराज असल्याची चर्चा रंगत असतानाच काँग्रेसचे नेते तसेच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांसंदर्भात एक सूचक विधान केलं आहे.
मोदी सरकार 3.0 च्या शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी, सरकार आली नसती तर ते (अजित पवार) बाहेर पडले असते, असं विधान अजित पवारांच्या गटाबद्दल बोलताना केलं. वडेट्टीवार यांनी पुढे बोलताना, जसं फडणवीसांचं ईडीचं प्रकरण बंद झालं त्याप्रमाणे त्यांची सगळी प्रकरणं बंद झाली असतील. असं अनेकांचं आहे. भुजबळांचीही तीच स्थिती आहे. सत्तेत जाऊन आपली प्रकरणी फाईल करुन येत असतील तर हा एक नवीन कल्पना आहे. भारतातील लोकांना पटणारी आहे असं समजायला हरकत नाही, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
