#

Advertisement

Tuesday, June 4, 2024, June 04, 2024 WIB
Last Updated 2024-06-04T13:08:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ऍड. कोमलताई ढोबळे यांनी घेतलेली "ती" बैठक ठरली कलाटणी देणारी

Advertisement

राज्यातील विजयी उमेदवारांना बहुजन रयत परीषदेच्या मतांचा मोठा टेकू 

सोलापूर : लोकसभा मतदार संघात प्रचार शिगेला पोहचला होता त्यावेळी अनेक पक्ष मतांची जुळवाजुळव करत होती, पक्षाच्या उमेदवारांना मोठी आकडेमोड करावी लागत होती. अटीतटीची लढाई होणार हे स्पष्ट झाले होते, त्यामुळे संस्था अन् समाज घटकासह एका-एका सामान्य नागरिकाचे मत महत्त्वाचे ठरणार हे स्पष्ट झालेले असताना सोलापुरात मातंग समाजाचे नेते तथा भाजपचे प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांचा विसर अन्य पक्षासह भाजपच्या उमेदवारांलाही पडला होता. त्याच वेळी लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी बहुजन रयत परीषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेत आपल्याला कोणत्याही पक्षाला थेट पाठींबा द्यायचा नाही, जनतेच्या समस्या सोडविणार्‍या आणि जनतेच्या मनातील उमेदवाराच निवडून यायला हवा, अशा उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहन केले होते, ऍड. कोमलताई यांनी केलेले हे आवाहन राजकारणाला मोठी कलाटणी देणारे ठरले. कारण, बहुजन रयत परीषदेने संपूर्ण महाराष्ट्रात ज्या-ज्या उमेदवाराला मतदान केले ते उमेदवार निवडून आले आहेत. परंतु, सोलापुरात मात्र भारतीय जनता पक्षाच्या हेच जमले नसल्याची चर्चा आता सुरू आहे. 

सोलापुरातील ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे हे भाजपचे राज्य प्रवक्ते आहेत. लोकसभेसाठी ते इच्छुक होते तर महिला उमेदवार द्यायचा झाल्यास त्यांच्या कन्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. परंतु, राम सातपुतेंना उमेदवारी दिली गेली, त्यानंतर ढोबळे यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमुंत्री दवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतले होते, परंतु आगामी काळासाठी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यानंतर ढोबळे शांत झाले असले तरी बापासाठी लेक ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या सातत्याने पुढे येत असल्याचे दिसून आले. 

या दरम्यान त्यांनी शरद पवार यांचे जुने फोटोंचे स्टोटस ठेवत खळबळ उडवून दिली होती होती. त्या शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची जोरदार चर्चाही झाली, त्यातच प्रचार रंगात येत असताना त्यांनी आपल्या बहुजन रयत परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकारी, कार्यक़र्त्यांची विशेष बैठक घेतली होती. बहुजन रयत परिषद थेट कोणत्याही पक्षाला पाठींबा देणार नसल्याचे जाहीर करीत असताना जिंकून येणार्‍या उमेदवारालाच मतदान करण्याचे आवाहन ऍड. कोमलताई यांनी केले होते. त्याचवेळी त्यांचे पुन्हा एकदा राजकीय तज्ज्ञांना लावा तर्कचे... आव्हानच केले होते. आज, सोलापुरातील लोकसभेच्या निकालानंतर याचा तर्क सर्वजण आपआपल्या पद्धतीने लावू लागले आहेत.