#

Advertisement

Friday, June 7, 2024, June 07, 2024 WIB
Last Updated 2024-06-07T11:14:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' आमदार ठाकरेंच्या संपर्कात

Advertisement

मुंबई : शिवसेनेतून वेगळं होत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला उदयास आणलं आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्हंही मिळवलं त्याच शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाच्या संपर्कात असणाऱ्या त्या आमदारांचा लवकरच पक्षप्रवेशही होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या माहितीमुळं राजकीय वर्तुळात आता अनेक चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळाल्यानंतर काही राजकीय समीकरणं बदलणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत अनेक हालचाली पाहायला मिळत असून, ठाकरेंच्या संपर्कात असणाऱ्या आमदारांची लवकरच घरवापसी होईल अशी माहिती समोर आली आहे.