Advertisement
शिवानी अग्रवालकडून उडवाउडवीची उत्तरे
पुणे : पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईची पुन्हा चौकशी केली जात आहे. चौकशीत आरोपीची आई शिवानी अग्रवाल उडवाउडवीची उत्तरं देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ब्लड सॅम्पल बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये सहभाग तपासला जातो आहे.
शिवानी अग्रवालवर सबळ पुरावे हाती लागल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवानी अग्रवालला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
विशाल अग्रवालला आज दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. त्याची ब्लड सॅम्पल बदलल्याच्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी केली जाईल. ड्रायव्हर अपहरण आणि धमकी प्रकरणात विशाल अग्रवालची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याला पोलीस आज पुन्हा ताब्यात घेऊन अटक करणार आहेत. त्यामुळे विशाल अग्रवालला उद्या पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.
