Advertisement
मुंबई : खरं चित्र जे आहे ते प्रचंड दुर्देवी आहे. मी अनेकवेळी म्हटलंय की, ओबीसी आणि मराठा हे बहुजन होते. त्यांच्यात भांडण होऊ नये असं मी सांगायचे. मी कोणत्याही मंचावर जाऊन कुणाला काही बोलावं असं मी कधी केलं नाही. आपल्या राज्यात सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे ही माझी भावना आहे. पण आता परिस्थिती वेगळी झाली आहे. त्यातून राज्यकर्तेच मार्ग काढू शकतात. दोन्ही समाजाच्या लोकांनी आपले मुद्दे घेऊन मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले तर चर्चा होऊन त्यातून मार्ग निघेल, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
ओबीस आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची समजूत काढायला राज्य सरकारला यश आलं आहे. शुक्रवारी झालेल्या महाबैठकीनंतर आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हाके यांनी हे उपोषण त्यांनी तात्काळ स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे. या उपोषणानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये पंकजा मुंडे यांनी आपले मत मांडले.
