#

Advertisement

Wednesday, June 26, 2024, June 26, 2024 WIB
Last Updated 2024-06-26T10:59:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पोषण आहारात आढळली मेलेली चिमणी

Advertisement

नागपूर येथील घटना, पुणे मध्येही धान्याला किड

 नागपूर : नागपूर जिल्ह्यात पोषण आहाराच्या धान्यात मेलेली चिमणी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पारशिवानी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायतीमधील ही घटना आहे. नील शिंदेकर या मुलाला देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेली चिमणी आढळली. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.. यासंदर्भात, सरपंच आणि गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंना निवेदन दिल आहे. दरम्यान, तक्रारीनंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीनं दिली आहे.
पुण्यातही अशाच एका घटनेनं खळबळ उडाली. शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याला कीड लागल्याचं समोर आल आहे. तांदुळ, मटकीसह मुगडाळीत किडे आणि अळ्या आढळल्या आहेत. खेड तालुक्यातल्या बहुळमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आला मात्र, यासाठी लागणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.