Advertisement
शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीनं सर्व निवडणुका लढविणार
पुणे : बारामतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत जिंकल्यावर सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीतील दादागिरी मोडून काढण्याचे ठरवलं आहे.
निवडणूक काळात कार्यकर्त्यांना धमकावणं, ऐन मतदानाच्या दिवशी वेल्ह्यातील पीडीसीसी बँक 24 तास उघडी असणं, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंची दमदाटी, काम करा अन्यथा बघून घेऊ अशी अजितदादांची भाषा, मत दिलं तरच निधी मिळेल, अशा अनेक तक्रारी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाविरोधात आल्या. त्याचा हिशोब चुकता करायचा विडा सुप्रिया सुळेंनी आता उचलला आहे.
अजितदादांनी नाती बाजूला ठेवून राजकारणाचा खेळ खेळल्यानं आता सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावायला सज्ज झाल्या आहेत. अगदी दूध संघापासून ते ग्रामपंचायत, अगदी विधानसभा निवडणुकीत आपण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीनं उतरणार, अशी घोषणाच सुप्रिया सुळेंनी केली आहे.