Advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला अनपेक्षित असे यश मिळाले. या विजयामुळे खूश झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातील 288 जागांपैकी 125 जागा लढवण्याची तयारी ठकारे गटाने केली आहे. शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, सुनील प्रभू आणि राजन विचारे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत प्रमुख विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची रणनीती तयार करण्यावर एकमत झाले. मात्र, शिवसेनेच्या या दाव्यामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस यांची अडचण होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीतील हा अनुभव पाहता ठाकरे गटाने आतापासूनच आक्रमक पवित्र घेतला आहे. ठाकरे यांनी या बैठकीमध्ये 125 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या जागांना लक्ष्य करण्यासाठी समर्पित ‘थिंक टँक’ असलेली वॉर रूम स्थापन करण्याचा विचार आहे. शिवसेना ठाकरे गट मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या फरकाच्या आधारावर या जागांवर दावा करणार आहे. याशिवाय, या मतदारसंघांची अ, ब आणि क अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करणार आहे. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने NDA मध्ये असताना 124 जागा लढवल्या होत्या. भाजप आणि इतर मित्र पक्षांसाठी 163 जागा सोडल्या होत्या.
