Advertisement
मुंबई :राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या `12 जागांबाबत महत्वाचं विधान केलं आहे. यातील किती जागा कोणत्या पक्षाला मिळणार? राष्ट्रवादी अजित पवार गट किती जागा लढणार? यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं.राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या 12 जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. राज्यपाल नियुक्त 12 विधानपरिषद जागांपैकी भाजपकडे 6 जागा असतील. एकनाथ शिंदे यांना 3 जागा आणि आम्हाला 3 जागा मिळतील अशी शक्यता आहे. आमची इच्छा होती की 4-4 तिघांना जागा मिळाव्या. पण तसं होण्याची शक्यता कमी आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
