Advertisement
20 तारखेला हा पक्षप्रवेश होणार
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का आहे. अजित पवार गटाचे 39 नेते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला हा मोठा धक्का आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 39 पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या 20 तारखेला हा पक्षप्रवेश होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची ताकद मात्र वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा करिश्मा चालला नाही. अजित पवार गटाला केवळ रायगडची जागा जिंकता आली. त्यातच आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. असं असतानाच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. पिंपरी- चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीत फूट पडण्याआधीही पिंपरी- चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांना मानत होते. त्याचमुळे अनेकांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांसोबत महायुतीत जाणं पसंत केलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
शरद पवार म्हणाले..
मागच्या काही दिवसांपासून पिंपरीतील काही नेते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शरद पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. यावेळी पक्षातून बाहेर गेलल्यांना परत पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हापक्ष सोडून गेलेलं लोक परत येण्याबाबत मला कोण भेटलं नाही. पण जयंत पाटील यांना भेटले आहेत. याची मला माहिती आहे, असं शरद पवार म्हणाले.
