Advertisement
उद्धव ठाकरेंनी दिली वसंत मोरे यांना जबाबदारी
पुणे : पुण्यातून वंचितच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढलेल्या वसंत मोरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. वसंतराव मोरे आणि तुमचे सहकारी शिवसैनिकांचं स्वगृही परतल्याबद्दल मी स्वागत करतो, तुम्ही मधल्या काळात जर शिवसेना सोडली तर तुम्हाला शिक्षा तर झाली पाहिजे. वसंतरावांना पण शिक्षा झाली पाहिजे. ती शिक्षा अशी आहे की, पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मला पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे. ती वाढवण्याची जबाबदारी तुमची… ही तुमची शिक्षा असेल. शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे. त्याला तसं घेऊ नका. ही जबाबदारी म्हणून घ्या. पण पुण्यात आपल्याला शिवसेना वाढवायची आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे.पुणे क्रांतीकारकांचं शहर आहे. पुणे हे महाराष्ट्रातील सत्ताबदलाचं केंद्र असलं पाहिजे. पुण्यात आता मला शिवसैनिकांचा मेळावा घ्यायचा आहे. तेव्हा सगळे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांना बोलवा. सगळ्यांशी मला संवाद साधायचा आहे. तुम्हा सगळ्याना पुण्यात काम करण्यासाठी शुभेच्छा असं उद्धव ठाकरेंनी म्हटल आहे.
