#

Advertisement

Thursday, July 11, 2024, July 11, 2024 WIB
Last Updated 2024-07-11T11:41:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्याच्या राजकारणात पुन्हा "हॉटेल पॉलिटिक्स"

Advertisement

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्सला वेग आला आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या धर्तीवर बरीच राजकीय खलबतं सुरू असून, आता या मतदान प्रक्रियेमध्ये घोडेबाजार होऊ नये या कारणास्तव पक्षांनी कमालीची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. मतांमध्ये फूट पडू नये यासाठी आमदार महोदयांना चक्क मुंबई शहरातील पंतारांकित हॉटेलांमध्ये वास्तव्याची सुविधा करून देण्यात आली आहे. विधानपरिषदेतील 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून, यासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 
क्रॉस व्होटींगची सर्वात जास्त भीती सत्ताधारी पक्षाला वाटतेय... असं सांगत संजय राऊतांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय...येत्या 12 जुलैला विधानपरिषदेची निवडणूक होणाराय. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आपल्या आमदारांना 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलंय... मतं फुटण्याची भीती सगळ्याच राजकीय पक्षांना आहे, हेच यातून स्पष्ट आहे. 

5 स्टार पॉलिटिक्सवर करोडोंची उधळपट्टी
भाजपकडून सर्व आमदारांच्या वास्तव्याची सोय मुंबईच्या कुलाबा येथील ताज प्रेसिंडेंट या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार या हॉटेलात एका रात्रीसाठी एका रुममागे साधारण 15 ते 20 हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागते. 
अजित पवार गटानं आमदारांची सर्व व्यवस्था विमानतळ परिसरात असणाऱ्या द ललित या आलिशान हॉटेलमध्ये केली आहे. कमाल रचना आणि सुविधा असणाऱ्या या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी मोजावे लागतता 15 ते 20 हजार रुपये.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल या कमाल हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. दक्षिण मध्य मुंबईमध्ये असणाऱ्या या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी जवळपास 12 ते 15 हजार रुपये इतकी किंमत मोजावी लागले असं म्हणतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार निवडणूक होईपर्यंत ताज लँड्स एंड इथं वास्तव्यास असतील असं सांगितलं जात आहे. सी व्ह्यू आणि इतर सर्वच सोयीसुविधा असणाऱ्या या हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामासाठी जवळपास 15 ते 25 हजार रुपये इतकी आहे.