#

Advertisement

Wednesday, July 10, 2024, July 10, 2024 WIB
Last Updated 2024-07-10T12:04:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात विधानसभेसाठी इच्छुकांची मोठी यादी

Advertisement

सोलापूर : जिल्ह्यातील 11विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला मोहोळ, माढा, माळशिरस, शिवसेना ठाकरे गटाला सांगोला, बार्शी, करमाळा तर काँग्रेसला अक्कलकोट, दक्षिण, शहर उत्तर सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत माकपची मदत दिंडोरी मतदारसंघात घेतल्याने त्यांनी सीताराम येचुरी यांनी दोन जागा देण्याचा शब्द दिला आहे त्यात दिंडोरी व सोलापूर शहर मध्य म्हणून शहर मध्यची जागा आडम मास्तर यांना सुटण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

मंगळवेढा-पंढरपूरचा विचार केला तर भगीरथ भालके यांना उमेदवारी निश्चित मिळेल अशी चर्चा आहे. शहर उत्तर मध्ये महेश कोठे यांनी लोकसभेत मदत केली ते उमेदवारीत पहिल्या क्रमांकावर येतात, ते तुतारी घेणार की हात चिन्ह, याबाबत संभ्रम आहे. येथून राष्ट्रवादीकडून लिंगायत समाजाचे शंकर पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. लिंगायत समाजातील सुदीप चाकोते हे जास्त प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. तर आता नव्याने सुशील बंदपट्टे, राजन कामत, सुनील रसाळे यांची नावेही समोर येवू लागली आहेत. आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ नेत्या संध्या काळे याही इच्छुक आहेत. 

शहर मध्य मध्ये फारुक शाब्दि हे एमआयएमचे उमेदवार असू शकतात, भाजपकडून देवेंद्र कोठे अथवा ऐनवेळी राम सातपुते हे उमेदवार म्हणून उतरण्याची दाट शक्यता आहे, शिवसेना शिंदे गटाची ही जागा असल्याने येथून शिवाजी सावंत, मनिष काळजे, ज्योती वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. मुस्लिम समाजातून तौफिक शेख, रियाज हुंडेकरी हे इच्छुक आहेत.तसेच, मोची समाजातील संजय हेमगड्डी यांचीही नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. 

दक्षिण सोलापूर भाजप कडून सुभाष देशमुख यांना उमेदवारी फायनल मानली जाते. 2019 च्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षापासून अलिप्त राहिलेले माजी आमदार दिलीप माने हे ही काँग्रेस कडून प्रमुख दावेदार मानले जातात. सुशीलकुमार यांच्याजवळचे मानले जाणारे सुरेश हसापुरे यांनी दक्षिणवर दावा सांगितला आहे. त्यांना संधी मिळेल अशी दाट शक्यता आहे. पण ते निवडणूक लढविणार का नाही हे गुलदस्त्यात आहे.

सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनुरे हे सुद्धा दक्षिण मधून इच्छुक आहेत त्यांनी सामाजिक कार्यातून आपली चर्चा सुरू ठेवली आहे. शिवसेना उबाठा गटातून अमर पाटील यांनी ही मागणी केली आहे. बाबा मिस्त्री यांनी 2019 ची निवडणूक लढवल्याने ते पुन्हा दक्षिण मधून पुन्हा एकदा आपला क्लेम सांगत आहेत. सिध्देश्वर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे ऐनवेळी दक्षिण मधून उभे राहू शकतात. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निश्चितच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. परंतु माजी आमदार पुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे सुद्धा इच्छुक असल्याचे समोर येत आहे.