#

Advertisement

Wednesday, July 10, 2024, July 10, 2024 WIB
Last Updated 2024-07-10T11:47:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

सोलापूरात ‘भावी आमदार’च्या पोस्टरची चर्चा

Advertisement

सोलापूर :  शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन्ही मतदारसंघाचा एकत्रित कृतज्ञता मिळावा रविवारी अक्कलकोट रोड वरील बोमड्याल मंगल कार्यालयात घेण्यात आला. या मेळाव्यात विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांची मोठी  गर्दी झाली होती.
या मेळाव्याच्या दोन दिवस अगोदर झालेल्या नियोजन बैठकीत कार्यकर्त्यांनी शहर उत्तर काँग्रेसकडे घेण्यासाठी जोर धरल्याचे सांगण्यात आले. उत्तर हा मतदारसंघ पारंपारिक काँग्रेसचा आहे जोर लावला तर पुन्हा तो आपल्या ताब्यात मिळू शकेल. त्यासाठी महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ काँग्रेसला घ्यावा अशी मागणी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी शहराध्यक्ष नरोटे यांच्याकडे केली होती.
त्यानुसार या मेळाव्यासाठी शहर उत्तर मध्ये सुदीप चाकोते यांनी प्रत्येक चौका चौकात पोस्टर लावून या कार्यक्रमाची वातावरण निर्मिती केली. त्यावर सुदीप चाकोते यांच्या फोटो खाली भावी आमदार असे लिहिल्याने ते दोन शब्द राजकीय वर्तुळात चर्चेचे ठरत आहेत. लिंगायत समाजातील युवा चेहरा, स्वतःच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेले कार्य, सेवा दल यंग ब्रिगेड च्या माध्यमातून युवकांचे बांधलेली फळी आहे सुदीप यांच्यासाठी प्लस पॉईंट मानले जातात. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत असलेले चांगले संबंध आणि राष्ट्रीय पातळीवर असलेली चाकोते यांची ओळख त्यांना भविष्यात फायदेशीर ठरेल अशी चर्चा आहे.